Wednesday, 22 August 2012

एक वावटळ.

१ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट ... एक वावटळ...!!!


११ ऑगस्ट चा  हिंसाचार घडवला जातो काय..??? किवा घडतो.. 
खरं काय ते देवं च जाणे..!! (आता कुठला देव तो तुमचा तुम्ही ठरवा)

त्या नंतर  झाला एक ... रेकॉर्ड ब्रेक मोर्चा झाला... त्यात तर सारा  जनसागर लोटला....
सारे NEWS CHANNEL मध्ये युद्धच सुरु झालं .. सगळ्यांचा लक्ष  फक्त एकाच  Breaking NEWS कडे  

क्रिकेट  मध्ये जेवढी उत्सुकता आता राहिली नसेल तितकी  उत्सुकता हे   NEWS CHANNEL वाले निर्माण करतात आणि आपल्याला किती नाही म्हंटला तरी त्यात गुंगवून टाकतात...

आता हास्यास्पद वाटावं किवा फिल्मी वाटावं असं सुद्धा घडत आहे.. एक नेता सांगतो माझ्या विभागात बांग्ला देशी दाखवा आणि दोन कोटी रुपये घेऊन जा..
 अरे ते काय LOTTERY  चा  TICKET आहे कि  JACK POT...???
आपण फक्त बघत राहायचा का... ?

सोसत तर आपणही आहोतच कारण फक्त ५ SMS  दिवसाला
(किती  हाल होतात प्रेमी युगुलांचे, तरुण भाबड्या मुला मुलींचे ज्यांचे संवाद आजकाल तोंडा ऐवजी हात ने होत असतात ) ,अनेक WEB SITE   वर बंधी,, FACE BOOK  वरही येऊ शकते कदाचित..
 तेव्हा पटकन काय वाटतंय ते इकडे POST करून टाकलं...

आता ह्याचा शेवट कसा न काय होतो ते बघायचं.. कि नेहमी प्रमाणे हे एक वावटळ असेल जे निघून जाईल आणि पुन्हा काहीतरी नवीन मुद्दा.  नवीन वाद , हिंसाचार जन्माला घातला येयील  आणि आपणही मागचा सगळं विसरून त्या भविष्यात होणारया नवीन वादा ची चव NEWS चान्नेल्स मधून लुटू !!


 - विनीत मराठे