Monday, 3 September 2012

आता तरी सुधरा ...

साला.. " जरा कुठे" एक मराठी नेता " यु पी " आणि बिहारी घुसपेठ्या  विरुद्ध  बोलला , कि लगेच " देशद्रोह" आणि  "गुंडा" आणि हि उपमा देणारे कोण तर तेच उत्तरेचे  NEWS CHANNEL  वाले ... लगेच हि विधान म्हणजे विस्फोटक आणि वादग्रस्त? लगेच त्याची चौकाशी ???
फक्त महाराष्ट्र ने आवाज उठवला कि इतके सगळे उपरे आणि तेव्हा सगळे विरोधी बोलणार " आपण सारे भारतीय आहोत, " भारतात कोणी हि कुठे जाऊ शकतो?" अशी तद्दन नुसतं पुस्तकात वाचण्या जोगी वाक्य बोलणार  पण ज्याची जळते त्यालाच कळते...
"प्रांत वाद"  नावाचा एक मुद्दा लगेच उकरून बाहेर काढता..??? मग बाकीची राज्य जेव्हा  ह्या यु पी  आणी बिहारी लोकां वर सतत कारवाई आणि त्यांना राज्यात "उपरे" म्हणून , "गुलाम"
 म्हणून ठेवत असतात  तेव्हा कुठे जातात सगळे NEWS CHANNEL S , "सगळे भारतीय" आहोत ची प्रौढी मिरवणारे...तेव्हा का तुमचा आवाज बंद होतो.. ???

आवाज कोणाचा .. आपला मराठी माणसांचा !! कारण आपण मूळ आहोत... आणि ज्यांना कोणाला हा संकुचित विचार वाटत असेल त्यांना धन्यवाद...!!!
आता आपल्यातले  सुद्धा जे कोणी "नासलेले मराठी" म्हणजे  आहेत  ज्यांना सुद्धा वाटता आपण "भारतीय " आहोत किवा कोणीही कुठे भारतात जाऊन काहीही करू शकतो तर त्यांनी भविष्याचा विचार करून वागवा आताच वेळ आहे उद्या परिणाम तुम्हाला हि भोगावा लागणार आहेत हेय निच्चीत...!!!

कारण ह्या आधी साधारण २० वर्ष पूर्वी चा जरी विचार केला तर , आपल्या मुंबई मध्ये किवा संपूर्ण महाराष्ट्रात इतके गुन्हे , अपहरणा, खून, बलात्कार, रोगाच्या साठी, बेमालूम वाढत जाणारी झोपडपट्टी होती का???? ते वाढायच  एकाच कारण लोंढे वाढले ... वेळेच ठेचलं गेलं नाही त्याची हि फळे आहेत. तेव्हा आताच जागे व्हा , आधी स्वतःला आणि आपला जन्म भूमी मुंबई आणि महाराष्ट्र ला स्वतः ला  वाचवा मग मी भारतीय आहे ची प्रौढी मिरवा!!!

कोण कुठला अबू, कोण तो कृपा शंकर इकडे येतो आणि महाराष्ट्र चा मंत्री होतो ... ह्यात आपले मराठी राजकारणी सुद्धा फाटलेले.. जेव्हा एक व्हायचा असता तेव्हा होत नाहीत... आता बघा एक मराठी माणूस भारताचा गृह मंत्री झाल्यावर किती काटे बोचत आहेत उत्तर वाल्यांना.. सगळी लोब्ब्य एकत्र होते त्यांची.. तेव्हा ते आपाप सात भेदभाव करत नाहीत एक होऊन मराठी मंत्राय्ना विरोध करतात.. काही न काही कंद घडवतात जसे आता सगळे मुंबई आणि भारतात चालू आहे जेव्हा पासून एक मराठी माणूस गृह मंत्री झालाय ..
 
छत्रपती शिवाजी टर्मिनस व आझाद मैदानात जेव्हा  हल्ला झाला तेव्हा कुठे गेला होता तुमचं " संविधान" तेव्हा कुठे गेले होते हक्क आणि कायदे..??
आता तर काय म्हणे जो गृह मंत्री तोच "एक मराठी"  असून त्या उत्तर भारीतीयांच्या दबावाखाली येऊन विधान करतो कि " कोणाला हि कुठही भारतात येऊन काहीही करायचा हक्क आहे" ह्यात साला...
ह्या वर चीड नाही येत ते षंढ !!!
आताच .News Channel वर पाहिलं कोणी तरी समाज सेविका आपली अक्कल पाजळत होती कि भारताच्या इतर राज्यात सुद्धा मराठी माणसा राहतात उद्या त्यांना सुद्धा त्रास सहन करावा लागेल... पण एक ग्वाही आहे कि इतके वर्ष इतर राज्यात राहत असलेल्या मराठी माणसा कडून कधी काही चुकीचा वागलेलें किवा गुन्हा झाले ला वाचनात सुधा आला आहे का ???
तेव्हा .. आता तरी सो कॉल्ड भारतीय म्हनार्या आणि संविधान वगरे शब्द वापरणाऱ्या ढेकणा जागा हो नाहीतर भविष्यात ठेचला जाशील ह्याच भारतीयान कडून.....!!
- विनीत मराठे

Wednesday, 22 August 2012

एक वावटळ.

१ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट ... एक वावटळ...!!!


११ ऑगस्ट चा  हिंसाचार घडवला जातो काय..??? किवा घडतो.. 
खरं काय ते देवं च जाणे..!! (आता कुठला देव तो तुमचा तुम्ही ठरवा)

त्या नंतर  झाला एक ... रेकॉर्ड ब्रेक मोर्चा झाला... त्यात तर सारा  जनसागर लोटला....
सारे NEWS CHANNEL मध्ये युद्धच सुरु झालं .. सगळ्यांचा लक्ष  फक्त एकाच  Breaking NEWS कडे  

क्रिकेट  मध्ये जेवढी उत्सुकता आता राहिली नसेल तितकी  उत्सुकता हे   NEWS CHANNEL वाले निर्माण करतात आणि आपल्याला किती नाही म्हंटला तरी त्यात गुंगवून टाकतात...

आता हास्यास्पद वाटावं किवा फिल्मी वाटावं असं सुद्धा घडत आहे.. एक नेता सांगतो माझ्या विभागात बांग्ला देशी दाखवा आणि दोन कोटी रुपये घेऊन जा..
 अरे ते काय LOTTERY  चा  TICKET आहे कि  JACK POT...???
आपण फक्त बघत राहायचा का... ?

सोसत तर आपणही आहोतच कारण फक्त ५ SMS  दिवसाला
(किती  हाल होतात प्रेमी युगुलांचे, तरुण भाबड्या मुला मुलींचे ज्यांचे संवाद आजकाल तोंडा ऐवजी हात ने होत असतात ) ,अनेक WEB SITE   वर बंधी,, FACE BOOK  वरही येऊ शकते कदाचित..
 तेव्हा पटकन काय वाटतंय ते इकडे POST करून टाकलं...

आता ह्याचा शेवट कसा न काय होतो ते बघायचं.. कि नेहमी प्रमाणे हे एक वावटळ असेल जे निघून जाईल आणि पुन्हा काहीतरी नवीन मुद्दा.  नवीन वाद , हिंसाचार जन्माला घातला येयील  आणि आपणही मागचा सगळं विसरून त्या भविष्यात होणारया नवीन वादा ची चव NEWS चान्नेल्स मधून लुटू !!


 - विनीत मराठे

Sunday, 29 July 2012

तेरड्याचे रंग तीन दिवस !!!!!!

तेरड्याचे रंग तीन दिवस !!!!!! दोन दिवसापूर्वी वृतापात्रातून एक बातमी वाचनास पडली .. ती म्हणजे " दादर मध्ये फेरीवाल्यांचा जल्लोष , फेरीवाले एकमेकांना मिठाई भरवत असतानाचे फोटो ".......... तीन महिन्यापूर्वी एक दिवस रोजच्या सारखा ऑफिस मधून परतत असताना सगळं दादर , दादर चा पत्री पूल, दादर फुल बाजार.. सगळं कसं रिकामं रिकामं वाटलं,,मनात शंका आली कि काही विपरीत तर घडले नाही ना??? सगळी कडे शुकशुकाट...तसाच तडक घरी आलो,, सगळे news channel पहिले, पण काही घडल्याची breaking news नव्हती ...... दुसरया न तिसर्या दिवशी सुद्धा दादर परिसरात तोच शुकशुकाट., काहीतरी चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते.. पण एक मोठा फलक नजरेस पडला.. " दादर फूल बझार आणि दादर स्टेशन च्या १०० मीटर परिसरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाले विक्रेते ह्यांना मज्जाव करण्यात आला आहे " ..नुसतं इतका वाचून उर आनंदाने भरून आला...मग काय आधी जेव्हा दादर स्टेशन मधून बाहेर पडण्यास जो १५/ २० मिनटांचा वेळ लागत होता तो फका ३ /४ मिनटांवर आला.. ऑफिसातला थकवा ते सर्व रिकामे बघून कुठल्या कुठे गायब व्ह्ययचा.. बर तर महानगर पालिकेने .. तिकडे चोव्वीस तास त्याची माल उचलणारी गाडी, पोलीस बंदोबस्त आणि सुशोभित झाडांच्या कुंड्या लावल्या मग तर काय सगळं कसं चकचकीत ...:) मी सुद्धा ज्या महान माणसाने इतक्या वर्ष नंतर हे काम केले त्या सर्व अधिकाऱ्यांना , महानगर पालिके ला धन्यवाद दिले...!! पण म्हणतात न तेरड्याचे रंग तीन दिवस,, आनंदावर विरजण पडलेच... परवाच बातमी वाचली .. कि ज्या महान माणसाने... श्री जैन ह्यांनी "दादर" ला गेले 3 महिने का होइएन मोकळा श्वास घायला दिला होता त्यांचाच श्वास कोंडला गेला . त्यांचीच बदली करण्यात आली.. त्या मागे काय कारण असेल देव जाणे... किवा आयुक्त जाणे... इतकं चांगलं काम करत असून सुद्ध अशी वागणूक मिळत असेल तर.. चांगला काम कोण करेल??? ह्यात एका राजकीय पक्षाने हस्तक्षेप करून श्री जैन ह्यांची बदली करायला भाग पाडावे.. हे विशेष !!!! कारण असेल कि त्यांचा "पक्ष " चालवण्या करता जमणारा फंडात कदाचित भर पडणं बंद झालं असेल .... किवा त्या फेरीवाल्यान कडून मिळणाऱ्या मुठभर मतां मूळे समस्त दादर कराना आणि इकडे येणाऱ्या ना वेठीस धरणार??? ह्याचा अर्थ काय.. राजकीय पक्षाने दादर मधल्या स्थानिकांना चांगल्या सुविधा , पुरवायच्या कि त्यांच्याच स्वान्तत्र्यावर आणि हक्कावर अशी गदा आणायची???? ह्यात चूक कोणाची.. समस्त दादर करांची??? त्या राजकीय पक्षाची..??? कि महानगरपालिकेची ????????? आपण सर्व सामान्यांनी अस शांत बसून उपयोग नाही.. आता पुन्हा आपल्यालाच सामोरे जावे लागणार त्या कुबट वासाला .. त्या भाजीच्या चिखलाला.. त्या घामच्या आणि पानाच्या पिच्कार्याना...!!!!! - विनीत मराठे ( एक दादरकर)