Sunday, 29 July 2012
तेरड्याचे रंग तीन दिवस !!!!!!
तेरड्याचे रंग तीन दिवस !!!!!!
दोन दिवसापूर्वी वृतापात्रातून एक बातमी वाचनास पडली ..
ती म्हणजे " दादर मध्ये फेरीवाल्यांचा जल्लोष , फेरीवाले एकमेकांना मिठाई भरवत असतानाचे फोटो "..........
तीन महिन्यापूर्वी एक दिवस रोजच्या सारखा ऑफिस मधून परतत असताना सगळं दादर , दादर चा पत्री पूल, दादर फुल बाजार.. सगळं कसं रिकामं रिकामं वाटलं,,मनात शंका आली कि काही विपरीत तर घडले नाही ना??? सगळी कडे शुकशुकाट...तसाच तडक घरी आलो,, सगळे news channel पहिले, पण काही घडल्याची breaking news नव्हती ......
दुसरया न तिसर्या दिवशी सुद्धा दादर परिसरात तोच शुकशुकाट., काहीतरी चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते..
पण एक मोठा फलक नजरेस पडला..
" दादर फूल बझार आणि दादर स्टेशन च्या १०० मीटर परिसरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाले विक्रेते ह्यांना मज्जाव करण्यात आला आहे "
..नुसतं इतका वाचून उर आनंदाने भरून आला...मग काय आधी जेव्हा दादर स्टेशन मधून बाहेर पडण्यास जो १५/ २० मिनटांचा वेळ लागत होता तो फका ३ /४ मिनटांवर आला.. ऑफिसातला थकवा ते सर्व रिकामे बघून कुठल्या कुठे गायब व्ह्ययचा..
बर तर महानगर पालिकेने .. तिकडे चोव्वीस तास त्याची माल उचलणारी गाडी, पोलीस बंदोबस्त आणि सुशोभित झाडांच्या कुंड्या लावल्या मग तर काय सगळं कसं चकचकीत ...:)
मी सुद्धा ज्या महान माणसाने इतक्या वर्ष नंतर हे काम केले त्या सर्व अधिकाऱ्यांना , महानगर पालिके ला धन्यवाद दिले...!!
पण म्हणतात न तेरड्याचे रंग तीन दिवस,, आनंदावर विरजण पडलेच...
परवाच बातमी वाचली ..
कि ज्या महान माणसाने... श्री जैन ह्यांनी "दादर" ला गेले 3 महिने का होइएन मोकळा श्वास घायला दिला होता त्यांचाच श्वास कोंडला गेला . त्यांचीच बदली करण्यात आली.. त्या मागे काय कारण असेल देव जाणे... किवा आयुक्त जाणे... इतकं चांगलं काम करत असून सुद्ध अशी वागणूक मिळत असेल तर.. चांगला काम कोण करेल???
ह्यात एका राजकीय पक्षाने हस्तक्षेप करून श्री जैन ह्यांची बदली करायला भाग पाडावे.. हे विशेष !!!!
कारण असेल कि त्यांचा "पक्ष " चालवण्या करता जमणारा फंडात कदाचित भर पडणं बंद झालं असेल ....
किवा त्या फेरीवाल्यान कडून मिळणाऱ्या मुठभर मतां मूळे समस्त दादर कराना आणि इकडे येणाऱ्या ना वेठीस धरणार???
ह्याचा अर्थ काय.. राजकीय पक्षाने दादर मधल्या स्थानिकांना चांगल्या सुविधा , पुरवायच्या कि त्यांच्याच स्वान्तत्र्यावर आणि हक्कावर अशी गदा आणायची????
ह्यात चूक कोणाची.. समस्त दादर करांची???
त्या राजकीय पक्षाची..???
कि महानगरपालिकेची ?????????
आपण सर्व सामान्यांनी अस शांत बसून उपयोग नाही..
आता पुन्हा आपल्यालाच सामोरे जावे लागणार त्या कुबट वासाला .. त्या भाजीच्या चिखलाला.. त्या घामच्या आणि पानाच्या पिच्कार्याना...!!!!!
- विनीत मराठे
( एक दादरकर)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment