Saturday, 16 April 2011

EK CHOTI PANIPURI

"एक छोटीसी पाणी-पुरी"!!!!!!
"ठाणे" ची पाणीपुरी भलतीच फामोउस झाली, कि फेमस केली गेली?
ह्याला नक्की जबाबदार कोण तुम्ही ?? आम्ही? की शासन ????
ह्याच्चीच काही कारण शोधयला मी जरा माझ्या "प्लेट" मधून हि पाणी पुरी चाखायचा प्रयत्न केला आहे .....

न्युज , मेडिया ने त्याला झटकन " STUNT बाजी " असा नाव देऊन भलतच फेमस केला, मग एका पक्षाला नेहमी प्रमाणे टार्गेट करून सरकार किवा विरोधी पक्ष मोकळे झाले.मी कोणाचीही बरोबर किवा चुकीची बाजू मांडत नाही आहे.त्या भैया चे ते कृत्य नक्कीच घृणास्पद होते ह्यात शंकाच नाही मग कोणी त्याविरुद्ध आवाज उठवला तर त्यात वावगं काय ?? ती तर नक्कीच ज्वलंत प्रतिक्रिया होते त्यात नक्कीच फक्त पक्षाचे लोक नाही तर काही सर्वसामान्य ठाणेकर हि नक्कीच असतील.खरा बघायचा तर ही सर्वस्वी जबाबदारी होते "महानगर पालिकेची" !!
एकदा रस्त्यावरच्या गाड्याना खाद्य विक्री ची परवानगी दिली कि त्यानंतर किती वेळा त्याची पुन्हा तपासणी होते? ज्या पद्धतीने हॉटेल मधल्या पदार्थंचा दर्जा ठरवला जातो तसा दर्जा ह्या गाड्यांवरील पदार्थना का दिला जात नाही ???
ह्यात कुठला नक्कीच मुद्दा उचलेगिरीचा किवा दुसऱ्या पक्षाची धोरणं चोरायचा प्रश्न नाही .. असाही बोला जात आहे कि येणाऱ्या पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी "स्तुंत" बाजी चा फायदा त्या पक्षाला होईल. त्यात आता नक्कीच परप्रांतीय त्यांची घुसखोरी, अरेरावीपणा आदी मुद्दे अपवादानं पुन्हा एकदा जन्माला आले, माझ्यामते तरी ते स्वाभाविक आहे . आणि असा आंदोलन करायची ती वेळच मुळात तशी होती, कोणाचाही संताप उद्रेक पावेल असेच ते कृत्य आणि त्याला जर फक्त रु. १२०० /- वर जमीन मिळत असेल तर ह्या हून हास्यास्पद गोष्ट नक्कीच दुसरी कुठली नाही ..
एक छोटी पाणीपुरी पण त्यात आता किती वेगळच राजकीय सामाजिक "पाणी" भरलं जात आहे ते विचारायची सोयच नाही प्रत्य्काचा हेतू, स्वर्थ वेगळा हे नक्कीच!!! हान आता ते hygenic आहे कि नाही ते ज्याने त्याने ठरवावा आपल्याला त्या पाणीपुरी मुले पोटात गडबड होत नाही ना ह्याची काळजी ज्याने त्याने घ्यावी. ..
एक चुकला नक्कीच कि त्या "भैया" ना किवा गाड्या तोडण्या ऐवजी, त्या महानगर पालीकामाधल्या अधिकार्यांना शिक्षा दायला हवी .. त्यांचे राजीनामे नक्कीच घायला हवेत कारण त्यांच्या कृपाशिर्वादाशिवाय ह्या गाड्या चालत नाहीत? त्यंच्यावर विक्री होत नाही.. तेव्हा शाषण ने असा एका पक्षावर खापर फोडून स्वतःची अशी सुटका करून घेणे रास्त नाही.
चाल खूप चर्चा झाली ,मला तरी पाणीपुरी खायला चौपाटी वर जायचं हान आता तिकडेच जाऊन ठरविण "भैया " ची पाणीपुरी खायची कि "भाऊ" ची...!!!!!!

No comments: